रावेरात भाजपा आंदोलनात आघाडी सरकारचा निषेध


रावेर : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावरील रावेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात शनिवारी भाजपातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित आहे. तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, संदीप सावळे, उत्तर महाराष्ट्र किसान मोर्चा संपर्क प्रमुख सुरेश धनके यांनी प्रसंगी महाविकास आघाडी सरकार टिकेची तोफ डागली.

वरणगावात भाजपा पदाधिकार्‍यांनी महामार्ग रोखला




यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनत जि.प.चे माजी सभापती सुरेश धनके, जि.प.सदस्य कैलास सरोदे, शिवाजी पाटील, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस.पाटील, तालुका उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे, पं.स. सभापती कविता कोळी, पं.स.उपसभापती धनश्री सावळे, बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे, संचालक श्रीकांत महाजन, शहराध्यक्ष दिलीप पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष महेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे, अ‍ॅड.प्रवीण पाचपोहे, संदीप सावळे, हरलाल कोळी, मनोज श्रावक, गिरीश पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहा.पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक, फौजदार मनोहर जाधव आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !