नवी नियमावली : उद्या केवळ अत्यावश्यक दुकाने राहणार सुरू


जळगाव : राज्यात डेल्टा प्लस व कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्यानंतर जळगाच जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा तिसर्‍या लेव्हलमध्ये समावेश झाल्यानंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी देखील शुक्रवार, 25 रोजी जिल्ह्यासाठी निर्बंध जारी केले. रविवार, 27 जूनपासून त्याची जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. शनिवार व रविवारी अत्यावश्यक दुकाने वगळते अन्य दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

असे आहेत निर्देश
सायंकाळी 5 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी तसेच जमावबंदी लागू राहील पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता जमता येणार नाही




सर्व अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने दररोज दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू राहतील व दुकानात पाच पेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत

इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी व रविवारी ही दुकाने पूर्णपणे बंद राहतील

कृषी संबंधी दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील.
शॉपींग मॉल, थिएटर्स, मल्टीफ्लेक्स, सिंगल स्क्रीन- पूर्णपणे बंद

सार्वजनिक ठिकाणे/खुले मैदाने/हॉटेल/रेस्टारंट/बार- 50 टक्के क्षमतेने व सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत व दुपारी चार ते रात्री नऊ दरम्यान केवळ पार्सल सुविधा तसेच शनिवार व रविवार पूर्णपणे बंद असतील

लग्न समारंभ- केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत

अंत्यविधी- केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत

शेतीविषयक सर्व कामे करता येतील.

सर्व प्रकारचे बांधकामे सुरू ठेवता येतील

जीम/सलून/ब्युटी पार्लर/स्पा सेंटर/वेलनेस सेंटर- सुरू ठेवता येईल

माल वाहतूक व्यवस्था- सुरू ठेवता येईल

आंतर जिल्हा प्रवास- सुरू

सर्व शाळा/महाविद्यालये/शैक्षणिक प्रशिक्षण/कोचिंग क्लासेस- बंद

हे वाचले का : नवी नियमावली : जळगाव जिल्हा तिसर्‍या लेव्हलमध्ये : आता पुन्हा निर्बंध



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !