लग्न समारंभातील अवाजवी खर्च टाळण्यासह शिक्षणावर द्यावा भर


शाह छप्परबंद मुस्लिम समाज मंडळ आग्रही : भुसावळात जिल्हास्तरीय बैठक

भुसावळ : मुस्लिम शाह छप्परबंद समाजाने विवाहआदी कार्यामध्ये होणारा वायफळ खर्च टाळावा, शासकीय व शैक्षणिक लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणे आणि समाजातील लोक एकमेकांशी जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा निर्णय बैठकीत झाला. भुसावळात ही जिल्हास्तरीय बैठक नुकतीच झाली.

यांच्या उपस्थितीत झाली बैठक
भारतीय शाह छप्परबंद मुस्लिम समाज सुधारक मंडळाची जिल्हास्तरीय बैठक बुधवारी भुसावळ येथे जिल्हा उपाध्यक्ष अशरफ अली शाह यांच्या निवासस्थानी झाली. जिल्हाध्यक्ष जाफर अली शाह यांची उपस्थिती होती. बैठकीत शाह छप्परबंद मुस्लिम समाजाच्या सद्यस्थितीवर चर्चा झाली. तसेच भुसावळ तालुक्यात शाह छप्परबंद मुस्लिम समाजातील लोकांना विमुक्त जातीचे दाखले लवकर द्यावे, येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळावा, जळगाव येथील जिल्हा विभागीय जात पडताळणी समितीने शाह छप्परबंद मुस्लिम समाजातील मुलांच्या भवितव्याचा विचार करून वैधता प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी पुढे आली. सामूहिक विवाह नियोजनाचा निर्णय झाला. या बैठकीत जिल्हाध्यक्ष जाफर अली शाह, जिल्हा उपाध्यक्ष अशरफ अली शाह, जिल्हा संघटक जाफर शाह, भुरा शाह, फारूख शाह, इशरत शाह, मजीद शाह, वजीर शाह, असगर शाह, अन्सार शाह, भुसावळचे हाजी अब्दुल रहीम शाह व बाबू अब्दुल रहीम शाह उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !