समाज उपयोगी हित जोपासताना व्यक्तिगत द्वेषाला मिळू नये थारा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
यावल : जीवनात पक्षीय वाद ही बाब वेगळी आहे मात्र समाज उपयोगी हित जोपासताना व्यक्तिगत द्वेष करता कामा नये, असे मत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावल येथील बाजार समितीच्या वतीने उभारलेल्या चाळण व प्रतवारी यंत्रणेच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार राजू मामा भोळे यांची उपस्थिती होती. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकर्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या यंत्रणेचे माजी खासदार तथा माजी आमदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते झाले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर मसाका चेअरमन शरद महाजन, यावल नगराध्यक्ष नौशाद तडवी, माजी नगराध्यक्षा सुरेखा कोळी, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, हर्षल पाटील, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुकाप्रमुख रवी सोनवणे, निवासी नायब तहसीलदार पवार, भुसावळ उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे , पुरोजीत चौधरी, कडू पाटील, संतोष धोबी, गोटू सोनवणे, योगेश पाटील, पप्पू जोशी, विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील, बाजार समिती सभापती मुन्ना पाटील, उपसभापती उमेश पाटील, कांचन फालक, कृषिभूषण नारायण चौधरी, राकेश फेगडेंसह कृषी उत्पन्न संचालक आदींची उपस्थित होती. प्रास्ताविक मुन्ना पाटील तर सूत्रसंचालन प्रा.जतीन मेढे यांनी केले तर आभार उमेश पाटील यांनी मानले.



