शेतकर्‍यांचा विश्‍वासघात करून कारखाना तोट्यात आणणार्‍या पुढार्‍यांचे षडयंत्र हाणून पाडा : प्रशांत डिक्कर


मुक्ताईनगर : मुक्ताईगनर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी दोन वर्षांपूर्वी मधुकर सहकारी साखर कारखान्याला ऊस दिला. कारखान्याला ऊस दिल्यानंतर एफआरपीप्रमाणे 14 दिवसात शेतकर्‍यांना ऊस बिल देणे बंधनकारक अयूप दोन वर्ष उलटूनही अद्यापपर्यंत कारखान्याने शेतकर्‍यांचे ऊस बिल दिले नसल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत. शेतकर्‍यांच्या सहकार्याने सहकारी तत्वावर कारखाने उभे करण्यात आले मात्र त्याच शेतकर्‍यांचा विश्वासघात करीत कारखाना तोट्यात आणायचा आणि काही कालांतराने तोच कारखाना विकत घ्यायचा हे पुढार्‍यांचे छडयंत्र आता हाणुन पाडा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केले. डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शेतकर्‍यांची बैठक थेरोळा येथे झाली. याप्रसंगी ते बोलत होते.

साखर आयुक्तांची भेट घेणार
शेतकर्‍यांच्या हक्कांच्या ऊस बिलाबाबत लवकरच साखर आयुक्तांना भेटुन (आरआरसी) अंतर्गत कारवाई करण्यास भाग पाडून शेतकर्‍यांचे ऊस बिल वसुल करणार असल्याचा विश्वास स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बैठकीत बोलतांना व्यक्त केला. कामगारांचे वेतन व पीएफ, निवृत्त झालेल्या कामगारांच्या ग्रॅच्युइटी रक्कम त्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.




यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला स्वाभिमानीचे रोशन देशमुख, तुकाराम पाटील, विशाल सावंत, अमोल रामचोरे, एकनाथ बेल्दार, सोपान बेलदार, निलेश पाटील, गजानन माडोकर, दिगंबर गरड, शांताराम तायडे, गुलाबराव मेंहगे, विकास खवले, गजानन पाटील, अजय पवार, सुनील बाठे, भास्कर सोनवणेंसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !