भुसावळातील गाळ वाहतूकदारास नगरपालिकेने बजावली नोटीस


भुसावळ : मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील नाल्यांची स्वच्छता सुरू असून गाळाची वाहतूक करताना रस्त्यावर मोठ्या प्रमावरणा घाण पडत असल्याने अपघाताची भीती वर्तवली जात होती. या संदर्भात पालिका प्रशासनाकडे तक्रारीदेखील करण्यात आल्याने मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी टहाकळी खुर्द, ता.जामनेर येथील मे.मोरे इंटरप्रायजेस यांना सोमवारी नोटीस बजावली आहे. गंगाराम प्लॉट, पंचशील नगर आदी भागातून डंपींग ग्राऊंडवर गाळाची वाहतूक करताना रस्त्यावरील चिखल/घाण स्वच्छ करावी व त्याशिवाय गाळाची वाहतूक करू नये, असे बजावण्यात आले आहे. नोटीसीशी दखल न घेतल्यास कारवाईचा इशारा मुख्याधिकार्‍यांनी दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !