29 वर्षीय तरुणीचा विनयभंग


जळगाव : शहरातील एका भागात राहणार्‍या 29 वर्षीय तरूणीचा मंगळवारी दुपारी चार वाजता बजरंग पांडूरंग सपकाळे (29, रा. श्रीराम नगर, जैनाबाद) या आरोपीने पाठलाग करीत तरुणीशी अश्लिल वर्तन करून तर चाकूचा धाक दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला तसेच चाकूने स्वत:च्या अंगावर वार करून जखमी करून घेतले. पीडीत तरूणीच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार वागळे करीत आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !