फ्रीज एसी घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार : शेख चांदविरोधात गुन्हा


भुसावळ : शहरातील गुरूनानक इलेक्ट्रॉनिक्समधून फ्रीज व ए.सी.खरेदी केल्यानंतर रक्कम न देता दुकानदाराची फसवणूक केल्याने आरोपी शेख चांद शेख हमीद (भुसावळ) विरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेख चांद याने 26 रोजी तक्रारदार जगदीशसिंग गुलबक्षसिंग छाबडा यांच्या गुरूनानक इलेक्ट्रॉनिक्समधून फ्रीज व ए.सी. खरेदी केला व यापोटीची 53 हजारांची रक्कम घरी जावून रीक्षा वाल्यासोबत देतो म्हणून वस्तू नेल्या मात्र रक्कम न दिल्याने दुकानदाराने बाजारपेठ पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !