शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळवून देण्याबाबत कटीबद्ध : आमदार डॉ.सुधीर तांबे


भुसावळ : शिक्षकांना शंभर टक्के अनुदान मिळवून देण्याबाबत कटीबद्ध असल्याची ग्वाही नाशिक विभाग पदवीधर आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता दिली. प्रसंगी विनानुदानित कृती संघटनेतर्फे पदाधिकार्‍यानी त्यांचे स्वागत केले. आमदार तांबे यांच्यासमोर प्रा.अनिल परदेशी व प्रा.पराग पाटील व सहकार्‍यांनी समस्या मांडल्या.

विविध समस्या सोडवण्याबाबत साकडे
यावेळी शालार्थ आय.डी.नंबर मिळण्याबाबत, त्याचबरोबर सेवासातत्य मिळण्याबाबत व उर्वरीत अघोषित तुकड्या घोषित करण्याविषयी, त्रृटीत असलेले प्रस्ताव लगेच घोषित करून त्यांचा पगार लवकर सुरू करण्यासाठी शासनाला निर्णय घेण्यास भाग पाडावे व प्रचलितनुसार पगार शंभर टक्के करावा, असा आग्रह संघटनेचे राज्य विभागीय सचिव अनिल परदेशी यांनी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्याकडे व्यक्त केला. यावेळी सर्व समस्यामी शिक्षण मंत्री यांच्या सोबत चर्चा करून सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आमदार तांबे म्हणाले.




यांची होती उपस्थिती
याप्रसंगी छोटू खडके, काँग्रेस शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे, प्रा.अनिल परदेशी, प्रा.पराग पाटील, प्रा.राजेंद्र साळुंके, प्रा.विजय ठोसर, प्रा.प्रकाश तायडे, प्रा.रवींद्र पवार, प्रा.अभिजीत पाटील, प्रा.संजय तळेले, प्रा.गौरव कोळी, प्रा.विवेकानंद शिंदे, प्रा.ललित पाटील, स्फुर्ती बोरोले, वासंती धाके, जुक्टो संघटनेचे प्रा.शैलेश राणे, प्रा.सुनील गरुड, प्रा.सुनील सोनार उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !