रावेरात बंद घर फोडले : सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास


रावेर : घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत रोकडसह दागिने मिळून एक लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. देवकी नगर ागात बंद ही चोरी झाली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

घर बंद असल्याची साधली संधी
राजकुमार देवदास गनवाणी (वय 50, रा. देवकी नगर रावेर) हे शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 30 जून रोजी दुपारी 1 ते 3 वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याचवेळी अज्ञात तीन चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून घरातील 70 हजार रुपये किमतीचे सोन्याचे शिक्के, नऊ हजार रुपये किमतीचे चांदीचे शिक्के, दोन हजार रुपये किमतीच्या चांदीचा लहान मुलांचा खुळखुळा आणि 40 हजार रुपयांची रोकड असा एकूण एक लाख 22 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !