इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीनंतर दुकानदाराला 53 हजारांचा चुना : आरोपी शेख चांद बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ : इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 53 हजार रुपये किंमतीचा ए.सी. व फ्रिज खरेदी केल्यानंतर दुकानदारास पैसे देण्यास टाळाटाळ करून दुकानदाराची फसवणूक केल्याप्रकरणी शेख चांद शेख हमीद (रा.दिनदयाल नगर, भुसावळ) विरोधात 26 जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी झाल्याने त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. आरोपी शुक्रवारी मध्यरात्री खडका चौफुली भागात आला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आला.

महागाड्या वस्तूंच्या खरेदीनंतर आरोपी पसार
शहरातील तेली मंगल कार्यलयाजवळील गुरुनानक इलेक्ट्रॉनिक दुकानातून आरोपी शेख चांद याने ए.सी. व फ्रीज खरेदी केला व रीक्षा चालकासोबत वस्तू घरी पाठवल्यानंतर पैसे पाठवेल, अशी हमी आरोपीने दिली मात्र वस्तू मिळाल्यानंतर पैसे न दिल्याने व फसवणुकीचा खात्री झाल्याने दुकानदार जगदीशसिंह छाबडा (रा.तेली मंगल कार्यलया, भुसावळ) यांनी 26 रोजी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.




यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक कृष्णा भोये, नाईक रवींद्र बिर्‍हाड, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी, परेश बिर्‍हाडे, जीवन कापडे आदींनी आरोपीला खडका चौफुली भागातून शुक्रवार, 2 रोजी मध्यरात्री अटक केली. तपास एपीआय कृष्णा भोये व रवींद्र तायडे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !