रावेर पंचायत समितीत भजनी मंडळांना साहित्य वाटप
रावेर : रावेर पंचायत समितीत शुक्रवारी तालुक्यातील पाच गावांमधील भजनी मंडळांना जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्याहस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परीषद समाज कल्याणच्या मागासवर्गीय विभागामार्फत 20 टक्के निधीतून तालुक्यातील मोरगांव, केर्हाळा बु.॥, चिनावल, वाघोदा व खिरवड येथील मंडळांना टाळ, मृदुंग, पेटीसह भजनासाठी लागणारे इतर साहित्य वाटप करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पंचायत समिती सभापती कविता कोळी, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, जुम्मा तडवी, योगीता वानखेडे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, प्रल्हाद पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे यांनी केले.



