यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.धीरज चौधरी


यावल : यावल तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड.धीरज व्ही. चौधरी यांची तर सचिवपदी अ‍ॅड.निलेश पी.मोरे व ग्रंथपालपदी अ‍ॅड. दत्तात्रेय सी. सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावलला बुधवार, 30 जुन रोजी यावल तालुका वकील संघाची बैठक झाली. अ‍ॅड.नितीन एम.चौधरी, अ‍ॅड.गोविंद एम.बारी यांची उपस्थिती होती.

नूतन कार्यकारीणीची निवड
वकील संघाच्या तालुका नुतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी अ‍ॅड.धीरज व्ही.चौधरी, सचिवपदी अ‍ॅड.निलेश पी.मोरे व ग्रंथपालपदी अ‍ॅड दत्तात्रेय सी.सावकारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीस अ‍ॅड.एस.जी.कवडीवाले, अ‍ॅड.आर.पी.गडे, अ‍ॅड.के.डी.पाटील, अ‍ॅड.एस.आर.लोंढे, अ‍ॅड.नितीन एम.चौधरी, अ‍ॅड.ए.आर.सुरळकर, अ‍ॅड.जी.एम.बारी, अ‍ॅड.खालीद ए.शेख, अ‍ॅड.ए.एस.कुलकर्णी, अ‍ॅड.यु.सी.बडगुजर, अ‍ॅड.मोहित शेख अमीन, अ‍ॅड.निवृत्ती पी.पाटील, अ‍ॅड.देवेंद्र आर.बाविस्कर, अ‍ॅड.के.डी.सोनवणे, अ‍ॅड.गौरव के.पाटील, अ‍ॅड.राजेश बारी आदी सदस्य उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !