भुसावळात आमदार संजय गायकवाडांच्या प्रतिमेस संविधान आर्मी पदाधिकार्यांनी मारले अंडे
अॅट्रॉसिटी संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध : 12 रोजी बुलढाण्यात ‘तलवार मोर्चा’
भुसावळ : अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणार्या बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा भुसावळातील संविधान आर्मीच्या पदाधिकार्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी आमदार गायकवाड यांच्या पुतळ्याला पदाधिकार्यांनी अंडे मारत जोरदार घोषणाबाजी केली. संविधान आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात रविवारी दुपारी जुन्या पालिकेसमोरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले.
12 रोजी बुलढाण्यात ‘छत्रपती शिवाजी तलवार मोर्चा’
आंदोलनात माजी नगरसेवक जगन सोनवणे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परीषद झाली. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध करीत 12 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘छत्रपती शिवाजी तलवार मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती सोनवणे यांनी देत या दिवशी महाराष्ट्र बंदची घोषणा केली. यावेळी माजी नगरसेवक पुष्पा जगन सोनवणे यांची पीआरपीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्ते प्रसंगी उपस्थित होते.



