वरणगाव ग्रामीण रुग्णालयात कोरोना लस घेण्यावरून वाद 


वरणगाव : ग्रामीण रुग्णालयात लस घेण्यावरून नागरीकांनी चांगलाच वाद केला. 80 लस आल्या असल्यातरी लस घेणारे मात्र दोनशेवर नागरीक जमल्याने शाब्दीक वाद वाढला. वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  संदीप बोरसे व कर्मचार्‍यांनी धाव घेत नागरीकांचे समजूत काढली. लस घेणार्‍यांना नंबरप्रमाणे कुपन देऊन वरणगाव पोलीस स्टेशन येथून ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस प्रशासनाला आपण सहकार्य करावे, असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक संदीप  बोरसे यांनी केले. कॉन्स्टेबल रामचंद्र मोरे,  कमलाकर राजहंस, पराग दुसाणे, अतुल कुमावत, गणेश माळी, होमगार्ड गजानन चव्हाण, महेश सोनार आदींनी जमावाला शांत केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !