इनरव्हील क्लब अध्यक्षा शीतल भराडीया यांचा सन्मान
भुसावळ : इनरव्हील डिस्ट्रीक्ट 303 द्वारा इनरव्हील क्लब भुसावळला 2020-21 मधे राबविण्यात आलेल्या प्रकल्पाकरीता 23 पुरस्कार प्राप्त झाले. त्यात इनरव्हील गार्डन विसावा, इनरव्हील वॉकींग ट्रॅक, पर्यावरण पूरक प्रकल्प, स्वयं सिद्धा प्रकल्प नवरात्री प्रकल्प, शैक्षणिक प्रकल्पासाठी पुरस्कार जाहीर झाले. इनरव्हील क्लब अध्यक्षा शीतल भराडिया यांना ट्रॉफी देऊन डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी यांनी सन्मानीत केले. पार एक्सेलेंस जेम प्रेसिडेंट पुरस्काराने भराडीया यांना गौरवण्यात आले. अधिकाधिक सदस्यांना क्लबमध्ये समाविष्ट करून घेतल्याने मेंबरशीप ग्रोथ पुरस्कारही त्यांना मिळाला. डिस्ट्रिक्ट 3 सेवाच्या अंतर्गत 105 प्रकल्प वर्षभरात राबविण्यात आले. या संपूर्ण कार्यासाठी रश्मी शर्मा, रत्नकांता अग्रवाल, मनीषा तायडे, रजनी सावकारे, वीणा लाहोटी, कमल सचदेव, शशीकला लाहोटी, कांचन जोशी, जयश्री दवे, रूचिका शर्मा, नूतन फालक, राखी भराडे आदींचे सहकार्य लाभले.




