हाणामारी भोवली : पाच जणांविरोधात गुन्हा


चाळीसगाव : 42 वर्षीय दुकानदारासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण करणार्‍या पाच जणांविरोधात शहर पोलिसात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार निलेश भास्कर साळुंखे (42, रा. गांधी चौक, ता.चाळीसगाव) यांच्या दत्तवाडी भागातील पंक्चर व गाडी वॉशिंगचे दुकानाजवळ 23 जानेवारी रोजी काचेच्या बाटल्या टाकण्यात आल्यानंतर निलेश यांनी याबाबत विचारणा केली असता आरोपींकडून त्यास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती तसेच अन्य आरोपींनी निलेशच्या डोक्यात मारून दुखापत पोहोचवली. ही घटना 23 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाळीसगाव न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शहर पोलिस स्थानकात निलेश साळुंखे यांच्या फिर्यादीवरून अकिल दादू खाटीक (45), अल्ताफ अकील खाटीक (25), तौसीफ शकील खाटीक (22), मुस्ताफ लतीफ खाटीक (23) व खलील शब्बीर खाटीक (45) (सर्व रा. खाटीक गल्ली, रिंग रोड ता. चाळीसगाव) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !