रावेरात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन


रावेर : पेट्रोल , डिझेल व गॅसच्या दरवाढीविरुद्ध केंद्र सरकारचा निषेध करीत माजी आमदार अरुण पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच विधीमंडळात गुंडशाही करणार्‍या भाजपच्या निलंबित 12 आमदारांचा निषेध करण्यात आला. यावेळी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमूद शेख, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, माजी जि प सदस्य रमेश पाटील, माजी नगराध्यक्ष गोटू महाजन, सावद्याचे राजेश वानखेडे, शेख सलीम, घनशाम पाटील, विलास ताठे , राजेंद्र चौधरी, किशोर पाटील, पंकज वाघ, माया बारी, हृदयेश पाटील, यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !