भुसावळात बहुजन मुक्ती पार्टीचा वीज बिलाविरोधात मोर्चा


भुसावळ : वाढत्या वीज बिलांच्या विरोधात शहरात बहुजन मुक्ती पार्टीने मंगळवारी सकाळी गांधी पुतळ्यापासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत तहसीलदार दीपक धीवरे यांना कंदील भेट दिला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

थकीत वीजबिल माफ करण्याची मागणी
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, 200 युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करावे, वीज ग्राहकांची लूट थांबवावी, मीटर भाड्यात कपात करावी, विजेचा स्थिर आकार व प्राथमिक भाव प्रमाणे दर आकारणी करावी, सक्तीची वीज बिल वसूली तातडीने थांबवावी, ज्या ग्राहकांनी मार्च 2020 पासून वीजबिल भरले नाही. त्यांच्यासाठी अभय योजना तयार करावी तसेच पुढील वर्षभर वीज बिल देवू नये तसेच 30 दिवसानंतर रीडींग घेणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.




यांनी दिले निवेदन
निवेदन देतान बहुजन मुक्ती पार्टीचे हारून मन्सुरी, विठ्ठल वाबळे, भरत जगताप, भूषण लोहार, वत्सलाबाई सूर्यवंशी, अनिता तळेले, प्रमिला जगताप, मंदा सूर्यवंशी, रेखा सूर्यवंशी, विमलबाई झाल्टे, लता केदारे, सरोजबाई वाघ, अंजना भावसार, आशाबाई भगत, नजमाबाई रफिक, अलकाबाई जामोदकर, मंगला कोल्हे, रईसा मन्सुरी, सुधाकर बडगुजर, प्रमोद आदींची उपस्थिती होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !