यावलमध्ये सराफा दुकानातून 11 लाखांच्या सोन्याची लूट : पोलिस अधीक्षक डॉ.मुंढे


घटनास्थळाची अधीक्षकांनी केली पाहणी : डॉग स्कॉडसह ठसे तज्ज्ञ दाखल : आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना

यावल : शहरातील गजबजलेल्या सराफा गल्लीत पिस्टलाच्या धाकावर दरोडा टाकून चोरट्यांनी सुमारे 240 ग्रॅम सोन्यासह 55 हजारांची रोकड लांबवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली. दरोड्याच्या अनुषंगाने त्यांनी यावलला भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व अधिकारी उपस्थित होते.

यावलमध्ये सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा : पिस्टलाच्या धाकावर लाखोंचे सोने लूटले 




नेमकी घटना घडली अशी !
यावल शहरातील सराफा बाजारात जगदीश कवडीवाले यांचे मुख्य बाजारपेठेत बाजीराव काशिनाथ कवडीवाले नामक सराफा दुकान आहे. दुकानात जगदीश कवडीवाले हे दुकानात बसले असताना दुपारी एक वाजेच्या सुमारास 22 ते 25 वयोगटातील मास्क लावलेले तीन तरुण दाखल झाले व त्याचवेळी चौथा संशयीत दाखल झाल्यानंतर त्याने दुकानाचे शटर लावून घेतले. कवडीवाले यांना दरोड्याचा अंदाज आल्याने त्यांनी हालचाल करताच दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला पिस्टल लावत ‘हालायचे नाही, बर्‍या बोलाने माल द्या, अन्यथा गोळी मारू’ असे सांगताच दरोडेखोरांनी काऊंटरवरील काच फोडत त्यातील दागिने पटापट पिशवीत भरत अवघ्या पाच मिनिटात लूट करून चोघे दरोडेखोर एकाच दुचाकीवरून पसार झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !