रावेर पुरवठा विभाग प्रकरणाची लवकरच चौकशी पूर्ण


रावेर : रावेर पुरवठा विभागातील कथित भ्रष्ट्राचाराचा कारभार बाहेर आल्यानंतर आता लवकरच या सर्व प्रकरणाची चौकशी पूर्ण होणार आहे. तसेच चौकशी अहवाल जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे देण्यात येणार असल्याने या प्रकरणाचा सस्पेन्स कमालीचा वाढला आहे. रावेर पुरवठा विभागाचा मनमानी कारभार बाहेर आल्यानंतर खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तत्कालीन पुरवठा निरीक्षक हर्षल पाटील यांना जबाबदार धरून 10 मे रोजी तडका-फडकी बदली केली होती. या प्रकरणाची मागील दोन महिन्यांपासून चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणाची चौकशी आता पूर्ण होणार आहेत.

पुरवठा प्रकरणात उत्सुकता वाढली
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी फैजपूरचे प्रांतधिकारी कैलास कडलग यांच्याकडे दिली होती. या प्रकरणाची चौकशी लवकरच पूर्ण होणार असून यात कोणी कर्तव्यात कसूर केला ? या सर्व प्रकरणात कोण जबाबदार आहे ? या सर्व प्रकरणाची उत्तरे चौकशी अहवालात असून कारवाईकडे आता लक्ष लागले आहे.




या कारणावरुन झाली चौकशी
रावेर पुरवठा विभागात शासकीय अर्जात परस्पर बदल करणे, अनुमती नसताना अर्ज छापून त्याची विक्री करणे, राजमुद्रा असलेला तहसीलदारांच्या शिक्क्यांचा गैरवापर करणे तसेच प्रति कार्ड तीन रुपयेप्रमाणे छापलेल्या अर्जांची विक्री करणे यासह अजुन इतर कारणांवरुन तडकाफडकी बदली करण्यात आली होती.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !