महिन्याभरात मेमु ट्रेन सुरू करा : खासदार उन्मेश पाटील यांची मागणी


मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्याशी रेल्वे समस्यांबाबत केली चर्चा

भुसावळ : महिनाभरात मेमू ट्रेन महिनाभरात सुरू करावी, अशी मागणी जळगावचे लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील यांनी भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याकडे केली. शुक्रवारी खासदारांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत काय उपाययोजना सुरू आहे तसेच भातखंडे रेल्वे गेटसह विविध अंडरपास, ओवरब्रिज आदी समस्यांसंदर्भात डीआरएम प्रशासनाशी संवाद साधला. या समस्यांचा निपटारा होण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावावी, अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी केली. डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी खासदारांच्या सूचना व तक्रारींच्या अनुषंगाने पुढील सप्ताहात बैठक बोलाविली जाईल, अशी माहिती दिली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !