खंडाळा सरपंचांसह ग्रामसेवकांवर गुन्हा नोंदवा


गटविकास अधिकार्‍यांकडे राष्ट्रीय दलित पँथरची मागणी

खंडाळा : खंडाळा ग्रामपंचायतीमधील रोजगार हमी योजना व 14 वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजना तसेच स्वच्छ भारत मिशन या योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गटविकास अधिकार्‍यांकडे राष्ट्रीय दलित पँथरने केली आहे. या प्रकारास दोषी असलेल्या खंडाळा सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल करण्यात आले नसल्यारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तर आंदोलन छेडण्याचा इशारा
संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा संघटनेतर्फे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल, इसा इशारा भुसावळ गटविकास अधिकारी विलास भटकर यांना राष्ट्रीय दलित पँथरने दिला आहे. निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती अशोक पाटील उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !