नकली नोटा प्रकरणात मध्यप्रदेश पोलिसांनी रावेरातून घेतले एकास ताब्यात


रावेर : रावेर शहरातुन नकली नोटा प्रकरणात मध्य प्रदेशच्या हरदा पोलिसांनी एका संशयीतास शनिवारी दुपारी ताब्यात घेल्याने एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात नकली नोटा प्रकरणात गुन्हा दाखल असून या प्रकरणात रावेरच्या इसमाचे नाव समोर आले आहे. शंभर रूपयाच्या नकली नोटा चलनात वापरल्याने हरदा ( मध्यप्रदेश) येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात नकली नोटा वापर करणारे आरोपी मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केले आहेत. त्यांची चौकशी केली असता त्यांनी नकली नोटा रावेर शहरातील  (मदीना कॉलनी) येथून २२ वर्षीय युवका कडून घेतल्याचे सांगितले. रावेर येथील संशयिताला ताब्यात घेण्यासाठी हरदा येथील डीवायएसपी प्रदीप शर्मा आपल्या टीमसह रावेरात येऊन पोलिस स्टेशन गाठले व या आरोपीबद्दल चौकशी केली असता पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रावेर पोलिस सुरेश मेढे, मंदार पाटील व तडवी यांना मध्य प्रदेश पोलिसांच्या सोबत जाऊन त्याला शनिवारी दुपारी ताब्यात घेऊन मध्येप्रदेशकडे रवाना झाले आहे. नकली नोटा संदर्भात मोठे रॅकेट सक्रीय असण्याची शक्यता असल्याने पुढील तपासासाठी आरोपीचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !