रावेरातील बोगस प्रमाणपत्र प्रकरण दडपण्यासाठी ग्रामसेवकांची धावपळ


रावेर : काही ग्रामसेवकांनी बोगस अपंग प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ घेतल्याचा विषय तालुकाभर चर्चेचा विषय असतांना आता नवीन माहिती समोर आली आहे. हे सर्व प्रकरण दडपण्यासाठी यातील दोन ग्रामसेवकांनी तालुक्यातील एका लोकप्रतिनिधी व जिल्हा परीषदेच्या एका अधिकार्‍याकडे यातुन वाचण्यासाठी धावाधाव करीत भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

दोषींवर कारवाईची अपेक्षा
आधीच आठ ग्राम सेवकांना अपंग प्रमाणपत्र सादर करण्यासाठी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी दहा दिवसाचा अल्टीमेटम दिला असतांना आता यातील दोन ग्राम सेवकांकडून संपूर्ण प्रकरणच दडपण्यासाठी व यात सेटलमेंट करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी त्यांनी तालुक्यातील एका लोकप्रतिनिधी व जिल्हा परीषदेच्या एका अधिकार्‍याची भेट घेतली आहे. त्यामुळे अपंग नसतांना प्रमाणपत्र काढून त्याचा लाभ शासकीय सेवेत घेऊन शासनाची फसवणूक करणा-यांवर कारवाई होणार की ग्रामसेवकांचे चव्हाट्यावर आलेले बोगस प्रमाणपत्र प्रकरण पळवाट काढून दडपले जाणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !