‘इनरव्हील’च्या अध्यक्षपदी वंदिता पारे


सचिवपदी अलका भटकर यांची निवड : पदग्रहण समारंभ उत्साहा

भुसावळ : इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभ शनिवारी रोटरी भवनात पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता केळकर व रश्मी शर्मा उपस्थित होत्या. या वर्षासाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा म्हणून वंदिता पारे यांनी शीतल भराडिया यांच्याकडून तर सचिवपद अलका भटकर यांनी रूचिका शर्मा यांच्याकडून पदभार स्वीकारला. या कार्यक्रमात वर्षभरात चांगली कामगिरी करणार्‍या सदस्यांचा सन्मान करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी रत्नकांता अग्रवाल, रजनी सावकारे, कमल सचदेव, सविता शुक्ला, सुनंदा भारुळे, राधा झवर, श्यामलता लढ्ढा, दीपा झवर, तृप्ती नागोरी, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष जी.आर.ठाकूर, शैलेश पारे, मनोज पारे, राजेंद्र फेगडे, अर्चना फेगडे, ममता सनांसे, अश्विन पारे, ऐश्ना पारे, शशिकला लाहोटी, मनीषा काबरा, महेश भराडिया उपस्थित होते. नवीन सदस्या म्हणून ममता सनांसे, वंदना जाधव, नीलाक्षी महाजन, सोनाली पाटील, वीणा ठाकूर, अर्चना ठाकूर सहभागी झाल्या.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !