भुसावळ रोटरी क्लबच्या पदाधिकार्‍यांनी पदभार स्वीकारला


भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळचा पदग्रहण समारंभ रोटरी हॉलमध्ये नुकताच झाला. समारंभासाठी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विलास भाटकर तसेच तहसीलदार दीपक धीवरे, संगीता पाटील व सर्व रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष म्हणून राजेंद्रकुमार फेगडे यांनी गजानन ठाकूर यांच्याकडून तर डॉ.गिरीश कुलकर्णी यांच्याकडून सचिव म्हणून राजेंद्र पाटील यांनी पदभार घेतला.

प्रशासनाचा उपयोग करून चांगले काम करा : संगीता पाटील
संगीता पाटील यांनी रोटरी क्लब समाजाच्या सेवेसाठी असून यामधील प्रत्येक घटकाने समाजासाठी काही देणे त्यासाठी कटीबद्ध राहून महिला सबलीकरण शिक्षण व पर्यावरण पूर्वक काम करावे तसेच अध्यक्ष हे प्रशासनातील असल्याने त्यांनी प्रशासनाचा उपयोग करून चांगले कार्य करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन हेमंत नाईक यांनी तर आभार आरती चौधरी यांनी मानले




रोटरी क्लबला ज्येष्ठ संघाची मदत
कार्यक्रमासाठी अष्टभुजा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब सोनवणे व पदाधिकार्‍यांनी रोटरी क्लबसाठी 11 हजारांची मदत केली. गजानन ठाकूर यांनी सुद्धा रोटरीच्या कामासाठी 11 हजारांची देणगी स्वरूपात मदत दिली. यशस्वीतेसाठी रोटरीचे कर्मचारी मनोज गुलाईकर यांनी व सर्व रोटेरीयन यांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !