भुसावळात उद्या कोविशील्डच्या दुसर्या डोससाठी लसीकरण होणार
भुसावळ : शहरात 45 वर्षांवरील नागरीकांसाठी सोमवार, 12 रोजी कोवीशील्ड लसीकरण होणार आहे.
न.पा.मुख्य दवाखान्यात उपलब्ध डोस 170



खडका रोड दवाखान्यात उपलब्ध डोस 170
वरणगाव रोड, दवाखान्यात उपलब्ध डोस 170
बद्री प्लॉट दवाखान्यात उपलब्ध डोस 170
महात्मा फुले नगर दवाखान्यात उपलब्ध डोस 170
दरम्यान, शासकीय विभागात पोलीस विभागाचे लसीकरण पोलीस वसाहतीत होणार असून त्यासाठी 150 डोस उपलब्ध आहेत.
लसीकरणाची सकाळी 9 ते 5 असलीतरी लसीचा साठा संपल्यानंतर लसीकरण केंद्र बंद होईल. केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार पहिल्या लसीच्या डोसनंतर दुसरा डोस 12 आठवडेनंतर अर्थात 84 दिवसाने घ्यायचा आहे.

