चारचाकी वाहनाच्या धडकेत भाऊ-बहिण ठार 


वरणगाव : येथून जवळच असलेल्या महामार्गावरील नागराणी पेट्रोल पंपाजवळ चारचाकी स्विप्ट वाहनाने  मोटरसायकलला धडक दिल्याने दोघे भाऊ-बहीण ठार झाल्याची  घटना रविवारु रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.  महामार्गावरील नागराणी पेट्रोल पंपाजवळ फॅक्टरी फाट्याकडे मोटरसायकलवर  दुर्गेश कोळी ( २०)  व पुजा विनोद कोळी ( १९) हे दोघे बहीण-भाऊ मुक्ताईनगरकडून महामार्गावर वळत असतांना मुक्ताईनगरकडून भरधाव येणारी स्विप्ट चारचाकी वाहनाने जबर धडक दिल्याने दोघे भाऊ-बहिणी जागीच ठार झाले. दोघे  रावेर तालुक्यातील गाते येथील रहिवासी असून या घटनेने गाती गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवच्छेदनासाठी आणण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !