किन्ही शिवारात गावठी हातभट्टी उद्ध्वस्त : तालुका पोलिसांची कारवाई
भुसावळ : तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील किन्ही शिवारात रविवारी दुपारी तालुका पोलिसांनी अचानक धाड टाकत गावठी दारूभट्टी नष्ट केली. या प्रकरणी संशयीत हिरु बुद्ध गवळी (रा.शिवपूर कन्हाळा) यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. किन्ही शिवाराील मधूसुदन चौधरी यांच्या विहिरीजवळ सार्वजनिक जागी गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत गूळ मोह नवसागर मिश्रीत 09 ड्रममधील सुमारे एक हजार 700 लीटर कच्चे-पक्के रसायन नष्ट केले तसेच गावठी हातभट्टीची तयार 30 लीटर दारू मिळून 66 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांंच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक अमोल पवार, हवालदार संदीप बडगे, गणेश राठोड, शिवाजी खंडारे, विचवे आदींच्या पथकाने केली.




