यावलमधील दरोड्याप्रकरणी सेनेचे संपर्क प्रमुख विलास पारकर यांची भेट


यावल : शहरातील सराफा व्यवसायीक तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानावर तीन दिवसांपूर्वी पडलेल्या दरोड्याच्या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख विलास पारकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान पाटील यांनी जगदीश कवडीवाले यांच्या सराफा दुकानास भेट दिली. यावेळी कवडीवाले यांच्या कुटुंबाशी उपस्थित मान्यवरांनी घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती जाणुन घेतली व त्यांना धीर दिला.

यांची होती उपस्थिती
या भेटीत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी, युवा सेनेचे तालुका सरचिटणीस सचिन कोळी, तालुका उपसंघटक पप्पू जोशी, युवा सेनेचे उपशहरप्रमुख पिंटु कुंभार, युवा सेनेचे शहर समन्वयक सागर बोरसे, युवा सेना सरचिटणीस विजय पंडित, शिवसेना विभागप्रमुख योगेश राजपूत, राजु श्रावगी, मयुर धोबी , भरत चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !