अल्पवयीन मुलीचा विनयभंग
यावल : तालुक्यातील किनगाव येथील 15 वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी बंटी उर्फ महेश एकनाथ वराडे (रा.किनगाव, ता.यावल) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीत अल्पवयीन मुलीने यावल पोलिसात तक्रार दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी बंटी वराडे विरोधात रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहेत.



