भुसावळातील जागा नावावर करण्यासह मूलभूत समस्या सोडवाव्यात : बेघर रहिवाशांचे निवेदन
भुसावळ |: वास्तव्यास असलेली जागा नावावर करावी तसेच पाणीपुरवठा, रोड, रस्ते, गटारी, सार्वजनिक शौचालये बांधून मिळावेत तसेच शासकीय योजनांचा लाभही मिळावा, अशी मागणी रेल्वेतर्फे काढण्यात आलेल्या अतिक्रमणातील बेघर झालेल्या रहिवाशांनी तहसील प्रशासनाकडे मंगळवारी केली. यावल रोडवरील सबस्टेशनच्या मागे राहात असलेल्या नागरीकांना कुठल्याही प्रकारच्या प्राथमिक सुविधा शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने त्यांनी समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, यापूर्वी 20 मे 2021 रोजी निवेदन सादर करण्यात आले मात्र त्याचीदेखील दखल घेण्यात आली नसल्याचे निवेदनात नमूद आहे.
तर आंदोलन छेडण्याचा इशारा
प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही तर परीसरातील रहिवासी आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर आकाश रामराव दहातोंडे, प्रवीण राजू जमदाडे, प्रदीप उत्तम भालेराव, गंगा वेदप्रकाश बागुल, मथुरा राजू पवार, गौतम राजाराम वानखेडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.



