बर्हाणपूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीचे लवकरच रुप पालटणार
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कामाला सुरूवात
मुक्ताईनगर : बर्हाणपूर रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीचा कायापालट करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुमारे दोन कोटींच्या निधीला मंजुरी मिळवली होती. गुरुवार, 15 जुलै रोजी स्मशानभूमीच्या कामाची लाईन आऊट टाकून कामाला सुरुवात करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, अल्पसंख्यांकचे अफसर खान, नगरसेवक संतोष कोळी, मुकेशचंद्र वानखेडे, संतोष मराठे, गोपाळ सोनवणे, सुभाष टेलर, तुषार बोरसे, उज्वल बोरसे, प्रशांत भोलाणे, प्रशांत पाटील, स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदींची उपस्थिती होती .



स्मशानभूमीत अद्यावत सोयी-सुविधा
नवीन हिंदू स्मशानभूमीच्या आराखड्यानुसार उत्तर दिशेला तीन ठिकाणी अंत्यसंस्काराची सुविधा, त्याच्यासमोर दक्षिणेकडून स्टेडियम स्वरूपात बसण्यासाठी आसन व्यवस्था तसेच स्टेडियममध्येच शौचालय, बाथरूम व सिक्युरिटी गार्डची राहण्याची व्यवस्था तसेच गोडावून स्वरूपात लाकडे (सरपण) ठेवण्याची व्यवस्था असेल तसेच परीसरात आकर्षक पेव्हर ब्लॉक बसविण्यात येऊन आकर्षक झाडांसह गार्डन स्वरूपात सुशोभिकरण येथे करण्यात येणार आहे.

