अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त


यावल : तालुक्यातील बोरखेडा येथे अवैध गौण खनिज वाहतुकीचे एक ट्रॅक्टर भालोदच्या महसूल गस्ती पथकाने पकडले. या ट्रॅक्टरमध्ये अवैधरीत्या वाळू वाहतूक केली जात होती. हे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. गस्ती पथकाने ट्रॅक्टर (एम.एच.19 ए.एन.1216) द्वारे वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पाठलाग करून ते पकडण्यात आले. चालक मुकेश कडू कोळी यांच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही. ही कारवाई तलाठी दीपक गवई, तलाठी निलेश धांडे, तलाठी वसीम तडवी, कोतवाल विजय आढाळे यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !