वरणगावचा तरुण जळगावातून बेपत्ता


वरणगाव : जळगाव येथील एस.के.तेल कंपनीत तेल भरण्यासाठी गेलेला वरणगावातील अक्सानगर भागातील रहिवासी असलेला चालक तरुण शुक्रवार, 16 रोजीच्या रात्रीपासून बेपत्ता झाला. या वरणगाव पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. शहरातील अक्सा नगर भागातील रहिवासी असलेला तरुण शे.अजरोद्दीन शे.अमीर (33) हा शुक्रवार, 16 रोजी जळगाव येथील एस.के.ऑईल कंपनीत तेल भरण्यासाठी मालट्रक घेऊन गेला होता मात्र उशीर झाल्याने त्याला कंपनीत प्रवेश मिळाला नसल्याने तो मालट्रक सोबत रात्री कंपनीच्या प्रवेश द्वारा बाहेरच उभा होता मात्र शनिवारच्या सकाळी 8.30 वाजेच्या नंतर तो प्रवेश द्वारावरील व्यक्तीस नास्ता करून येतो म्हणून सांगून निघाला मात्र परतलाच नाही. सदर तरुण कोणास दिसल्यास वरणगाव पोलीस ठाणे अथवा 97671-40071 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !