मुक्ताईनगरात दूषित पाण्याविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन


मुक्ताईनगर : सततच्या होणार्‍या दूषित व गढूळ पाणीपुरवठा विरोधात मुक्ताईनगर शहर काँग्रेसतर्फे नगरपंचायत इमारतीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे शहरात पुरवठा होणार्‍या पाण्याचे नमुने घ्यावेत तसेच जे स्रोत दूषित आहेत त्यांचे क्लोरीनेशन करण्यात यावे, अशी मागणी मुक्ताईनगर काँग्रेसतर्फे करण्यात आली. आरोग्य व स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाकडून पावसाळ्याच्या तोंडावर वारंवार तपासणी करून कायमस्वरूपी शहरातील दूषित पाण्याची समस्या सोडवावी अन्यथा शहर काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे यांनी दिला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.अरविंद गोसावी, मागास विभाग जिल्हा उपाध्यक्ष बी.डी.गवई, यासीन खान, अ‍ॅड.राहुल पाटील, संजय पाटील, राजू जाधव, निखील चौधरी, युवक विधानसभा अध्यक्ष नीरज बोराखेडे, निलेश भालेराव, शकील आझाद, आरीफ रब्बाणी, वसीम शेख, आनंदा कोळी, महेश खुळे, मितेश भालेराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !