गुरू ही तर अनुभवाची मूर्तीच : संत गोपाल महाराज


कोरोना नियमांचे पालन करीत पाल येथील श्री वृंदावन धाम आश्रमात गुरूपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रम

रावेर : गुरू ही करुणा आणि अनुभवाची मूर्ती असते कारण मनुष्य हा कितीही दोषी किंवा नास्तिक असला तर त्याचा समाज काहीवेळा बहिष्कार करतो मात्र संत, गुरू हे आपल्या भक्ताची चूक वेळोवेळी क्षमा करून करुणा व उत्कृष्ठ जीवन जगण्याची आणि वेळोवेळी सावध करण्याचे अनुभव देतात.जसे गुरुदेव प.पू.संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांना ज्यावेळी गुरुदीक्षा घ्यायची होती त्यावेळी योग्य गुरुची ओळख स्वप्नात साक्षात भगवान श्री रामदेवजी बाबा यांनी करून दिली होती, अस विचार गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या दिनी श्री वृंदावन धाम आश्रम पाल येथील विद्यमान गादीपति श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी व्यक्त केले. चैतन्य चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन सत्संगाद्वारे देशभरातील लाखो चैतन्य साधक परीवाराला त्यांनी संदेश दिला.

सकाळी पादूका पूजन व अभिषेक
शुक्रवारी गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून कोरोना या महामारीचे सर्व नियम व अटीचे पालन करीत केवळ आश्रमाचे विद्यमान गादीपती श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्य बाबाजी यांच्या सह आश्रमाचे ब्रम्हचारी यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता श्री हरीधाम मंदिरस्थित परम पूज्य सद्गुरु श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या समाधीस्थळी पादुका पूजन करण्यात आले. त्यानंतर महाआरती व अभिषेक करुन चैतन्य चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन सत्संग श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी देशभरातील लाखो भाविकांना संबोधीत केले. त्यांनतर आश्रमातील श्री शुभ चैतन्यजी महाराज, रामचरण चैतन्य आणि ललित चैतन्यजी महाराज यांना श्रद्धेय बाबाजींच्या हस्ते नैष्टिक ब्रम्हचार्याची दीक्षा प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला रावेर आमदार शिरीष चौधरी यांनची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !