मुंबईत संततधार : दोन रेल्वे गाड्या रद्द


भुसावळ : मुंबईत झालेल्या पावसानंतर गुरूवारी 28 गाड्या रद्द कण्यात आल्या होत्या शिवाय 13 गाड्यांचे मार्गात बदल करण्यात आले तर शुक्रवारी सुध्दा एलटीटी हरिद्वार आणि मुंबई पटना सुपरफास्ट या दोन गाड्या रद्द करण्यात आल्यात. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा थेट परीणाम रेल्वे गाड्यावर होत आहे. शुक्रवारी एलटीटी-हरिद्वार एसी सुपरफास्ट व मुंबई पटना सुपरफास्ट या दोन रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आ तर पठाणकोट एक्स्प्रेस 2.30, महानगरी एक्स्प्रेस 5 आणि कोकणातून येणारी मंगला एक्स्प्रेस ही गाडी आठ तास नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. गाड्या नियोजीत वेळेपेक्षा विलंबाने धावत असल्याने अनेक प्रवाशांना रेल्वे स्थानकावर ताटकळत बसावे लागले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !