मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात उद्या रक्तदान शिबिर
भुसावळ : महाराष्ट्राचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रेल कामगार सेना भुसावळर्फे भुसावळातील रेल्वे दवाखान्यात सोमवार, 26 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रेल कामगार सेनेतर्फे करण्यात आले आहे. रक्तदान करणार्या दातांनी रक्तदान करावे, असे आवाहन मंडळ अध्यक्ष ललितकुमारजी मुथा, सचिव राजेशजी लखोटे, कार्याध्यक्ष प्रीतमभाई टाक, संयुक्त सचिव विनोद वाघे, खजिनदार योगेश माळी यांनी केले आहे.

