विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संकल्पना राबवणार : आमदार संजय सावकारे
नाहाटात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात : माजी विद्यार्थ्यांची सहकार्याची ग्वाही
भुसावळ : माजी विद्यार्थ्यांनी सढळ हातांनी आजी विद्यार्थ्यांना मदत करावी व आजी विद्यार्थ्यांकरीता भविष्यात आपण नवनवीन संकल्पना राबवू व आजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू. अशी ग्वाही आमदार संजय सावकारे यांनी येथे दिली. भुसावळ कला, विज्ञान, आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा रविवार, 25 रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयात झाला. याप्रसंगी ते बोलत होते. महाविद्यालयाच्या संस्काराच्या शिदोरीतून आम्ही इथवर मजल मारली असून महाविद्यालयाला जी मदत आवश्यक असेल ती आम्ही केव्हाही देण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक हे तर उद्घाटक म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे होते. प्रमुख उपस्थिती ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, मुंबई येथून आलेले आर.पी.एफ इन्स्पेक्टर संजय गायकवाड साहेब, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्यामशेठ दरगड, निळकंठ भारंबे, प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.शैलेश पाटील उपस्थित होते. यावेळी कोवीड सारखा भयंकर आजार असल्याने हा मेळावा ऑनलाईन घेण्यात आला. या मेळाव्यात 115 विविध शहरातील माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.



महाविद्यालय संघटनेच्या पाठीशी : मोहन फालक
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांनी माजी विद्यार्थी संघटनेला आमच्या प्रशासनाकडून जे सहकार्य अपेक्षीत असेल ते आमचं प्रशासन देईल तसेच माजी विद्यार्थी संघटनेच्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही दिली. यावेळी उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्हाटे, अजय भोळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यांनी घेतले परीश्रम
1प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.जी.आर.वाणी यांनी केले तर आभार माजी विद्यार्थी संघटनेचे कोषाध्यक्ष तसेच मेळावा समन्वयक प्रा.हर्षल पाटील व सूत्रसंचालन मेघा चौधरी, ममता कोल्हे यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी आशिष चौधरी, प्रा.चंद्रकांत सरोदे, डॉ.गौरी पाटील, प्रा.दीपक पाटील, अजय भोळे, संतोष विनंते, प्रा.स्वाती शेळके, डॉ.सचिन येवले, डॉ.स्वाती फालक, डॉ.उमेश फेगडे, प्रा.संगीता भिरूड, डॉ.सचिन कोलते, डॉ.अजय क्षीरसागर, प्रा.महेश सरोदे, प्रा.शंकर पाटील, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.दीपाली नेमाडे, प्रा.काजल वारके, प्रा.कल्याणी पाटील यांनी परीश्रम घेतले.

