सुखद दिलासा : सावद्यात पावसाळ्यातही शुद्ध पाणीपुरवठा


सावदा : पावसाळ्यात एरव्ही गढूळ पाणीपुरवठ्याच्या तक्रारी असताना सावदावासी मात्र त्यास अपवाद ठरले आहे. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने गेल्या तीन दिवसांपासून धरणाचे 41 धरवाजे उघडण्यात आल्याने तापी नदीला पूर आला आहे तर सावदा शहराच्या फिल्टरेशन प्लॅट प्लँटवरही गढूळ पाणीपुरवठा येत आहे मात्र थोरगव्हाण रोडवरील फिल्टर प्लाँटवरील पाणीपुरवठा कर्मचारी निरंतर काम करीत असून दररोज 800 ते 850 किलो सरासरी तुरटी व ईलेक्ट्रोफोकल पावडरचा वापर करीत असून त्याद्वारे पाणी शुद्ध करून शहराला पाणीपुरवठा करीत आहेत.

नागरीकांनी व्यक्त केले समाधान
नागरीकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता जितेश पाटील, अविनाश पाटील, पांडु पाटील व सर्व पाणीपुरवठा कर्मचारी परीश्रम घेत आहेत. या ठिकाणी गटनेता नगरसेवक फिरोज खान पठाण, नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी भेट देत पाहणी केली व पाण्याची चाचणीही घेतली. शहरासाठी पाणी पुरवठा कर्मचारी घेत असलेली महेनत पाहुन त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी न.पा.सावदा पाणी पुरवठा निरीक्षक अविनाश पाटील, कर्मचारी विकास भंगाळे, पृथ्वी भंगाळे, पंकज बेंडाळे, नरेंद्र राणे आदींची उपस्थिती होती.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !