पक्षाच्या संघटन समीक्षा व संवाद दौर्‍याच्या यशस्वीतेसाठी कामाला लागा


वंचितचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेचे पदाधिकार्‍यांना आदेश

भुसावळ : वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर संघटन समीक्षा व संवाद दौरा सुरू झाला आहे. येत्या 29 जुलै रोजी सदर दौरा हा जळगाव जिल्ह्यात येत आहे. या दौर्‍याचे नियोजन करण्यासाठी पदाधिकार्‍यांना पक्षादेश व काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय विश्रागृहावर रविवारी दुपारी दोन वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद सोनावणे तर विशेष अतिथी म्हणून प्रमोद भाऊ इंगळे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) जळगाव उपस्थित होते.

पदाधिकार्‍यांशी साधला संवाद
बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा प्रवक्ता विनोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग, जिल्हा उपाध्यक्ष शफी शेख, जिल्हा उपाध्यक्ष नितीन रणीत, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सुरडकर, जिल्हा संघटक राजेंद्र बारी, आय.टी.जिल्हाप्रमुख सचिन बार्‍हे, जिल्हा सचिव दीपक मेघे, जिल्हा संघटक अरुण तायडे, कामगार आघाडी चिटणीस बालाजी पठाडे आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी यावल तालुकाध्यक्ष मनोज कापडे, बोदवड तालुकाध्यक्ष सुपडा निकम, रावेर तालुकाध्यक्ष बाळु शिरतुरे, भुसावळ तालुका महासचिव पल्ला बाँस घारू, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे यांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.




कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन
विनोद सोनवणे यांनी पदाधिकार्‍यांशी हितगुज करताना जिल्ह्यात पक्षाचा येणारा संघटन समीक्षा व संवाद दौरा यासाठी करावयाची तयारी आणि नियोजन याबाबत माहिती देत हा दौरा यशस्वी करण्यासाठी तन, मन, धनाने वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, संम्यक विद्यार्थी आंदोलन, सर्व पदधिकारी व कार्यकर्ते, बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांचे समर्थक व कार्यकर्ता यांना कामाला लागा, असे आवाहन केले. पक्षाच्या या बैठकीस यावल, रावेर, भुसावळ, जामनेर,बोदवड, मुक्ताईनगर तालुका, शहर पदधिकारी उपस्थित होते. आभार शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !