भुसावळ पोलीस दलातातील पदोन्नती मिळालेल्या अंमलदारांचा सत्कार
भुसावळ : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी नुकते जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले होते. त्यात भुसावळ पोलीस उपविभागातील 16 पोलीस अंमलदारांना या आदेशान्वये पदोन्नती मिळाली. पदोन्नती मिळालेल्या पोलीस अंमलदारांचा सोमवारी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शहर पोलीस ठाण्यात सन्मान केला. यावेळी भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू व भुसावळ शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी उपस्थित होते.
या कर्मचार्यांना मिळाली पदोन्नती
रशीद तडवी, इब्राहिम तडवी, इक्बाल सैय्यद शेख, रवींद्र बोराडे, विजय पोहेकर, प्रेमचंद सपकाळे, चंद्रभान बोदडे, आत्माराम भालेराव, संकेत झांबरे, श्रीकृष्ण देशमुख, रवींद्र तायडे, राहुल चौधरी, विकास सातदिवे, सोपान पाटील, समाधान पाटील या 16 कर्मचार्यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांचा सत्कार पोलीस उपअधीक्षकांनी करीत त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



