रावेर पंचायत समिती सदस्यांच्या शेष फंडमध्ये भ्रष्ट्राचार : आनंद बाविस्कर


रावेर : रावेर पंचायत समितीच्या सर्व सदस्यांच्या 2016-2021 दरम्यान खर्च केलेल्या शेष फंडमध्ये भ्रष्ट्राचार झाला असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी निळे निशान सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. रावेर पंचायत समिती सध्या तालुकाभरात प्रचंड चर्चेत आहे.

शेष फंडाची चौकशीची मागणी
निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे 2016-2021 मध्ये पंचायत समिती सदस्य यांच्या शेष फंडाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या फंडात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप आनंद बाविस्कर यांनी केला असून त्यांनी सोमवारी गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली. यामध्ये विविध योजनांच्या पात्र लाभार्थी यांचे नावे अंदाजपत्रक काम पूर्णत्वाचा दाखला मूल्यमापन नोंदची माहिती त्यांनी प्रशासनाला केली. यावेळी त्यांच्या सोबत दादाराव सवर्णे, बाळु निकम, जब्बार शेख, नजमुद्दीन शेख, विजय धनगर, नारायण सवर्णे, चंद्रकांत गाढे, पंकज कोळीख, सुधीर शेंगमीरे आदी निळे निशान सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !