मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण
भुसावळ : मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, प्रेरणा पंधरवड्याचे औचित्य साधून मंगळवारी यावल, हरीपूर, मोहराळे येथे वृक्षारोपण करण्यात आले. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख अजित चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच महाराष्ट्र राज्य प्रादेशिक सचिव सुधीर तायडे तसेच विभागीय उपाध्यक्ष हेमंत चौधरी यांच्या नेतृत्वात हरीपूरा, यावल मोहराळे येथे मोठ्या संख्येने वृक्षारोपण करण्यात आले
यांची होती उपस्थिती
यावेळी रावेर लोकसभा जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद गायकवाड, सरचिटणीस डॉ.नरेंद्र महाले, संघटक घनशाम निळे, सचिव बाळू गायकवाड, यावल तालुकाध्यक्ष रीयाज शेख, रऊफ सर, रफिक सर आणि शिक्षक सेना सदस्य व विद्यार्थी मित्र परीवारातील सदस्य उपस्थित होते. दरम्यान, यावल तालुकाध्यक्ष शेख रीयाज यांची कन्या फिलजा शेख हिच्या पहिल्या जन्म दिनानिमित्त यावल येथील डांगपूरा, बाबानगर येथे सुध्दा वृक्षारोपण करण्यात आले.



