वेब असोसिएशनच्या मुक्ताईनगर तालुका अध्यक्षपदी सतीश गायकवाड
उपाध्यक्षपदी गणेश महाजन तर सचिवपदी अक्षय काठोके यांची निवड
मुक्ताईनगर : शासकीय विश्रामगृहावर वेब मीडिया असोसिएशनची बैठक संघटनेचे अध्यक्ष अनिल महाजन, विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी सर्वानुमते मुक्ताईनगर तालुका आणि शहर कार्यकारीणी जाहीर झाली. मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष सतीश गायकवाड तर उपाध्यक्षपदी गणेश महाजन यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारीणीत तालुका सचिव अक्षय काठोके, तालुका सरचिटणीस विनोद बेलदार, तालुका समन्वयक शाकीर शेख, तालुका खजिनदार प्रमोद सौंदळे, मुक्ताईनगर शहराध्यक्ष अक्षय पालवे, उपाध्यक्ष पंकज कपले, शहर सचिव पंकज तायडे, शहर सरचिटणीस अमोल वैद्य, शहर समन्वयक आतीक खान, शहर खजिनदार अजगर शेख तर सदस्यांमध्ये देवेंद्र काटे, पंकज पाटील, विठ्ठल धनगर, योगेश पाटील, रवी पोहेकर यांचा समावेश आहे.




