सावद्यात जिल्हाधिकार्‍यांनी केली ‘माझी वसुंधरा योजनेची’ पाहणी


सावदा : शहरात मंगळवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा प्रशासन अधिकारी सतीष दिघे यांनी माझी वसुंधरा योजनेची पाहणी केली तसेच येथील वृक्ष प्रकल्पासदेखील भेट दिली. घनकचरा प्रकल्प, पाणी शुद्धीकरण केंद्र, नगरपालिका सभागृह आदी ठिकाणीदेखील पाहणी करून कामाप्रती समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी म्हणाले, मियावाकी प्रकल्प कौतुकास्पद
पालिकेतर्फे माझी वसुंधरा अंतर्गत वृक्ष लावून विकसीत करण्यात आलेल्या जागेची पाहणी करण्यात आली तसेच येथील श्री गुरुजी सेवा संस्था, संत तुकाराम वृक्ष सेवा मंडळ व नगरपालिका, सावदा यांच्या वतीने वृक्ष लागवड करून उभारण्यात येत असलेला मियावाकी जंगल प्रकल्प पाहण्यात आला. हा प्रकल्प कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. प्रकल्प संयोजक ऋषिकेश पाटील, कल्पेश शिवदे, सर्वेश लोमटे यांनी दिली. जिल्हाधिकारी राउत यांनी आयुर्वेदिक झाडांचा एक वेगळा भूखंड विकसीत करण्याबाबत भविष्यात विचार करावा, अशी मार्गदर्शक सूचना देखील केली. यावेळी फैजपूर मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सावद्याचे मुख्याधिकारी सौरभ जोशी, बांधकाम अभियंता अविनाश गवळे, धनराज राणे, महेश चौधरी, जितेश पाटील आदी उपस्थित होते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !