फैजपूर उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांचा सेवानिवृत्त पोलीस अधीक्षकांनी केला सन्मान
रावेर : निष्पक्षपाती न्याय करून देणारे अधिकारी म्हणून ख्याती असलेले फैजपूरचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे हे शनिवार, 31 पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी त्यांचा सन्मान केला. सावदा, निंभोरा व फैजपूर येथेही त्यांचा सन्मान करण्यात आला.
कायदा-सुव्यवस्थेला दिले प्राधान्य
पोलिस निरीक्षक पदावर असताना पिंगळे यांचे 2018 मध्ये प्रमोशन होऊन उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणून जात पडताळणी, नंदुरबार येथे त्यांची बदली झाली व त्यानंतर फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून ते रूजू झाले. नेहमी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी रावेर व यावल भागात तत्परतेने काम केले. रावेर दंगल असो की अहिरवाडी दंगल असो वा बोरखेडा हत्याकांड या गुन्ह्यात केलेला तपास मार्गदर्शक ठरला. कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी रात्र-दिवस न पाहणारा अधिकारी म्हणूनच त्यांची या परीसरात ओळख राहिली.



