चालकाची हत्या करीत कारमध्ये टाकला मृतदेह
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाका येथील पूलाखाली एका कारमध्ये चालकाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघड झाला असून नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकर्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाकर गंजी (43, रा.कणेरी, भिवंडी) असे हत्या झालेल्या ओला कार चालकाचे नाव आहे. मयत प्रभाकर हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावातील एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. मात्र लॉकडाऊनमुळे नोकरी गेल्याने कुटूंबाच्या उपजिवेकीसाठी ओला कारवर गेल्या एक ते दीड महिन्यापासून कार चालक म्हणून कार्यरत होता.




